आयफोन, आयपँड आणि आयपॉड टचसाठी अॅपल आर्केड ही व्हिडीओ गेम सर्विस ग्राहकांना मासिक शुल्क 4.99 डॉलरना (350 रूपये) मिळू शकते. अधिकृतरित्या अद्याप कंपनीकडून अॅपल आर्केडच्या किंमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
अॅपलची ‘हि’ सेवा वापरण्यासाठी मोजावे लागणार एवढे पैसे
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कंपनीच्या सभेत नवीन आयफोन लाँच करण्यात येणार आहेत. त्यावेळी कंपनी या सर्विसच्या किंमती जाहीर करू शकते. कंपनी आर्केड ही गेम सर्विस वापरण्यासाठी ग्राहकांना महिन्याला 4.99 डॉलर एवढे शुल्क भरावे लागणार असून, यामध्ये ग्राहकांना अनेक गेम्स एक्सेस करता येणार आहेत. आयफोन कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, लाँच केल्यानंतर यामध्ये 100 पेक्षा अधिक गेम्स असतील. या गेम खेळताना कोणत्याही जाहीराती दिसणार नाहीत, तसेच या गेम्स खरेदी देखील कराव्या लागणार नाहीत.
युजर्स या गेमिंग प्लँटफॉर्मवर अन्नापूर्म इंटरेक्टिव, बोसा स्टूडियोज, कार्टून नेटवर्क, फिंजी, गायंट स्किड, क्लेई एंटरटेनमेंट, कोनामी, लीगो सारख्या गेम डेव्हलपर्सच्या गेम्स खेळू शकणार आहेत. रिपोर्टनुसार, कंपनी काही मोजक्या ग्राहकांना अॅपल आर्केड ही सर्विस वापरण्यास देत असून, त्याद्वारे कंपनी या सर्विसचे परिक्षण करत आहे.