टीम इंडियाचे कसोटीच्या नवीन जर्सीत खास फोटोशूट


बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरूध्द होणाऱ्या कसोटी मालिकेआधी खेळाडूंची नवीन जर्सी लाँच केली आहे. या पांढऱ्या जर्सीवर आता खेळाडूंचे नाव आणि क्रंमाक आहेत. या नवीन जर्सीत कर्णधार विराट कोहली आणि संघातील अन्य खेळाडूंनी फोटोशूट केले आहे.


ऋषभ पंत, अंजिक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि कुलदीप यादव या खेळाडूंनी नवीन जर्सीतील फोटो सोशल मीडियवर शेअर केले. भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.  पहिला कसोटी सामना २२ ऑगस्टपासून अँटिगामध्ये खेळला जाईल.

कसोटी मालिकेआधी वेस्ट इंडिज विरूध्द झालेल्या टी20 मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवला होता. तर एकदिवसीय मालिकेत देखील भारताने 2-0 असा विजय मिळवला होता.  कसोटी मालिकेत देखील भारत हीच विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

दोन वर्ष खेळल्या जाणाऱ्या या टेस्ट चँम्पियनशीपमध्ये ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, भारत, न्युझीलंड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हे संघ 27 मालिकांमध्ये 71 कसोटी सामने केळणार आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment