ग्वाटेमाला- एक सुंदर पण धोकादायक देश


जगात जेवढे देश तेवढी विविधता पाहायला मिळते. त्यात काही देशात अनेक विचित्र प्रथा पाळल्या जातात आणि त्या ऐकून नवल वाटते. मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला हा असाच एक देश आहे. या देश अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण आहे मात्र हा देश तितकाच धोकादायकही आहे.

या देशाला निसर्गाचे वरदान आहे तसेच निसर्गाचा कोप वारंवार सहन करावा लागतो. बराच काळ हा देश गृहयुद्धात होरपळून निघाला आहे. मात्र तरीही येथील लोक आनंदी आहेत. येथे निसर्ग आणि प्रकृती हेच प्रामुख्याने माणसाचे शत्रू आहेत. वारंवार ज्वालामुखीचे उद्रेक होत असल्याने परिस्थिती धोकादायक बनते. भष्ट्राचार मोठया प्रमाणावर आहे. मात्र या देशाची प्राचीन संस्कृती, सभ्यता पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. चोहोबाजूला असलेली हिरवळ, डोंगर, दऱ्या आणि सुंदर किनारे यामुळे या देशात मनाला शांती मिळते असा अनुभव पर्यटक सांगतात.

या देशात एक विचित्र नियम आहे. तो ऐकला कि लोक आश्चर्याने थक्क होतात. येथे शव कबरीत ठेवण्यासाठी दर महिना भाडे द्यावे लागते. मृताच्या नातेवाईकांकडून जर एखादा महिना भाडे दिले गेले नाही तर शव कबरीतून बाहेर काढून ठेवले जाते आणि ती जागा दुसऱ्या मृताला दिली जाते. त्यामुळे हातची कबर जाऊ नये यासाठी नागरिक दक्ष राहतात आणि कबर मिळविण्यासाठी येथे चढाओढ असते.

Leave a Comment