करण जोहरने ‘त्या’ पार्टीच्या व्हिडिओवर सोडले मौन


दिल्लीचे आमदार मजिंदर सिरसा यांनी काही आठवड्यापूर्वी करण जोहरच्या घरी ड्रग पार्टी झाल्याचा आरोप केला होता. बॉलिवूडचे मोठे कलाकार या पार्टीत उपस्थित होते. दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जुन कपूरसह अनेकजण यात हजर होते. करण जोहरने बऱ्याच काळानंतर या प्रकरणी आपले मौन सोडले आहे.

करणच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ मजिंदर सिरसा यांनी शेअर केला होता. या पार्टीत सामिल कलाकार ड्रग सेवन करीत असल्याचा आरोप झाल्यामुळे बॉलिवूड कलाकारांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अलिकडे राजीव मसंद यांना करण जोहरने एक मुलाखत दिली, त्याने यात या विषयावर भाष्य केले. इंडस्ट्रीतील लोक आठवडाभराच्या कष्टानंतर एका संध्याकाळी एकत्र जमले होते. त्यांचा व्हिडिओ मी बनवला केला. तिथे असे काही घडत असते तर तो व्हिडिओ पोस्ट करायला मी मुर्ख आहे का ? असा सवाल त्याने केला.

डेंग्यूने विकी कौशल आजारी होता. गरम पाणी तो पीत असल्याचेही करणने सांगितले. हा व्हिडिओ शूट करण्याआधी पाच मिनिटापूर्वी माझी आई तिथे बसली होती, असेही तो म्हणाला. एकत्र बसून संगीत ऐकत खाद्य पदार्थांचा आनंद सर्वजण घेत होते हे सांगायलाही करण विसरला नाही. अशा तथ्यहिन गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले असल्याचेही करणने सांगितले.

Leave a Comment