पुन्हा एकदा जमणार ‘देसी बॉईज’ची जोडी


यंदाच्या स्वातंत्र्यदिनी जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ आणि अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हे चित्रपट रिलीज झाले. जॉनने शेअर केलेल्या एका गोष्टीतून हे दोन्ही अभिनेते एकमेकांचे उत्तम मित्र असून बॉक्स ऑफ्स क्लॅशचा त्यांच्या मैत्रीवर तुसभर देखील परिणाम झाला नसल्याचे समजते.

जॉनने नुकतेच एका माध्यमाला मुलाखत दिली. तो यात म्हणाला, मी जेव्हा अक्षयला मिशन मंगलच्या यशावर शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला तेव्हा त्याने दिलेल्या रिप्लायने माझे मन जिंकले. अक्षय म्हणाला, मला तुझ्या यशामुळे खूप आनंद झाला आहे. आता आपण एकत्र काम करण्याची वेळ झाली.

अक्षयच्या या मेसेजचा अर्थ हे कलाकार देसी बॉईजनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुर असून त्यांना एका उत्तम स्क्रीप्टची प्रतीक्षा आहे. दरम्यान आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या मिशन मंगलने ९७ कोटींची कमाई केली आहे. तर ५१ कोटींचा गल्ला बाटला हाऊसने जमावला आहे.

Leave a Comment