हा व्हिडीओ शेअर करण्यापासून आनंद महिंद्रा देखील स्वतःला रोखू शकले नाही


एक अमेरिकन व्यक्ती बॉलिवूडच्या हिंदी गाण्यांवर नाचतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा हे देखील हा व्हिडीओ शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये युट्यूबर क्यूपार्क (QPark) ‘चोली के पिछे क्या है’, ‘धूम 2’ चे टायटल ट्रँक, ‘शिला की जवानी’, ‘बोले चुडिया’ आणि दिलेर मेहंदींचे ‘टुनक टुनक टून’ या गाण्यावर नाचत आहे.


व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ‘पुढील वेळेस मॅनहँट्मच्या रस्त्यावर बॉलिवूडच्या गाण्यावर नाचणारा नक्कीच मी एकटा नसेल.’

हा व्हिडीओ 2018 मध्ये पब्लिश झाला होता, मात्र आनंद महिंद्रा यांनी शेअर केल्यानंतर लोकांना पुन्हा एकदा आनंद घेण्याची संधी मिळाली. महिंद्रा यांचे ट्विट अनेकांनी रिट्विट केले. अनेकांनी कमेंट्स देखील केल्या.

काहींनी लिहिले की, सर तुमचा डान्स पाहायला नक्कीच आवडेल. तर काहींनी लिहिले की, सर मी तुमचा कँमेरामन असेल.


महिंद्रा यांनी शेअर केलेल्या युट्यूबरने देखील त्यांना रिप्लाय दिला. काही दिवसांपुर्वीच महिंद्रा यांनी एका इराणच्या जिममध्ये लोक तामिळ गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

Leave a Comment