टीम कुक यांना पडली भारतीय फोटोग्राफरच्या फोटोंची भूरळ


सॅन फ्रान्सिस्को : भारतीय फोटोग्राफरने काढलेल्या फोटोंची भूरळ चक्क अॅपलचे सीईओ टीम कुक यांना पडली असून त्यांनी ते फोटो देखील ट्विट केले आहेत. त्यांनी या फोटोचे कौतुकही केले आहे. त्यांनी वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने आयफोनमधून काढलेले पाच फोटो ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. भारतीय फोटोग्राफर वरूण आदित्य याचाही यामध्ये फोटो आहे.


वरुणच्या या फोटोला टीम कुक यांनी सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. मुळचे भारतीय असलेल्या आदित्य हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाला त्यांचे फोटो ठेवले जातात. एक फोटो ट्विटरवर टाकत कुक यांनी म्हटले आहे की, दर रोज आमच्या ग्राहकांकडून आम्हाला आयफोनवर काढलेल्या फोटोंमुळे प्रेरणा मिळते. हे फोटो पाहून आनंदही होतो. आदित्य यांनी केनियाच्या एंबोसेलीमध्ये हत्तींसोबत इंद्रधनुष्याचा सुंदर फोटो काढला आहे.


आणखी एक ट्विट कुक यांनी करत सांगितले की, जगभरातील आपल्या आवडीच्या फोटोंवरून एक नजर टाका. दरम्यान, दोन स्वतंत्र फोटोग्राफरना आयफोन फोटोग्राफी अ‍ॅवॉर्ड (IPPAWARDS) 2019 मध्ये बक्षिस देण्यात आले. महाराष्ट्राची डिंपी भलोटिया हिला यामध्ये सिरीज कॅटेगरीमध्ये द्वितीय स्थान आणि कर्नाटकच्या श्रीकुमार कृष्‍णन यांना सनसेट कॅटेगरिमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे.

Leave a Comment