भारतीय लोक झोपण्यात अव्वल, जगाला टाकले मागे


पुर्ण झोप घेण्यामध्ये भारतीय लोक अव्वल स्थानी आहेत. या यादीत भारताने चीन, सउदी अरबच्या लोकांना मागे टाकले आहे. मार्केट रिसर्च फर्म केजीटी आणि फिलिप्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट समोर आली आहे. या सर्वेक्षणामध्ये 18 पेक्षा अधिक वयाच्या 11006 व्यक्तींनी सहभाग घेतला होता. सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे की, जगभरातील 62 टक्के लोकांना रात्री झोप येत नाही.

सर्वेक्षणानुसार, पुर्ण झोप घेण्याच्या यादीत साउथ कोरिया आणि जापानाच्या लोकांची स्थिती समान आहे. जगभरातील लोक सरासरी 6.8 तास झोपतात. तर आठवड्याच्या शेवटी हा आकडा 7.8 तासांपर्यंत पोहचतो. सर्वसाधारणपणे 8 तासांची झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र 10 पैकी 6 लोकच आठवड्याच्या शेवटी जास्त वेळ झोपतात.

सर्वेक्षणानुसार, मागील पाच वर्षात 10 पैकी 4 लोकांच्या झोपण्यावर परिणाम झाला आहे. तर 26 लोकांना अधिक चांगली झोप येते.

फिलिप्स ग्लोबल स्लीप सर्वेक्षण 2019 नुसार, कँनेडा आणि सिंगापूर असे देश आहेत जेथे झोप येण्याचा सर्वात जास्त तणाव आहे. तसेच कमी झोपेमुळे लाइफस्टाइलवर देखील त्याचा परिणाम होतो. सर्वेक्षणामध्ये झोप न येण्याची पाच कारणे देण्यात आली आहेत. तणाव 54 टक्के, झोपण्याची जागा 40 टक्के, काम  आणि शाळेचे शेड्युल 37 टक्के, इंटरटेंनमेंट 36 टक्के आणि आरोग्य 35 टक्के याचा समावेश आहे.

पुरूष घोरतात म्हणून झोप न होणाऱ्या विवाहित महिलांचे प्राण 35 टक्के आहे. 10 पैकी 6 युवकांना आठवड्यातून दोनदा दिवसा झोप येते. 67 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, रात्री एकदा तरी जाग नक्की येते. भारतात 36 टक्के आणि अमेरिकेत 30 टक्के लोक अशी आहेत, ज्यांना पाळलेल्या प्राण्याबरोबर झोपायला आवडते.

झोप मनुष्याला आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी गरजेची असते. अपुर्ण झोपेचा परिणाम हा मेंदूवर व त्याच्या क्षमतेवर होतो.

Leave a Comment