‘ईडी’कडून उन्मेष जोशी यांची तब्बल 8 तास चौकशी


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजाविण्यात आल्यामुळे मुंबईतील बलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयात काल सोमवारी सकाळी 11 वाजता उन्मेष जोशी दाखल झाले होते. जोशींची तब्बल 8 तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे. याबाबत ईडी सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीकडून उन्मेष जोशी यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. उन्मेष जोशी यांच्या कोहिनूर सिटीएनएल या कंपनीशी निगडित हे सर्व प्रश्न आहेत.

या प्रश्नांसोबतच कंपनीच्या एकूण बँक खाते, त्यांचे आर्थिक व्यवहार याच्याची निगडित अनेक प्रश्न उन्मेष जोशी यांना विचारण्यात आले आहेत. ईडीच्या तब्बल 8 तास चौकशी नंतर उन्मेष जोशी यांनी म्हटले की, उत्तम चौकशी झाली. मी चौकशीला संपूर्ण सहकार्य केले, मला पुन्हा बोलावणार आहेत.

Leave a Comment