सुंदर पेंटिंग्जनी सजली प्राचीन नगरी वाराणसी


पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीची स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतल्याचे दिसून येत आहे. वाराणसी शहर बऱ्याच अंशी स्वच्छ झाले आहेच पण शहरातील भिंती, उड्डाणपूल, पाण्याच्या टाक्या, गल्ल्या सुंदर पेंटिंग्जनी नटलेल्या दिसत आहेत.


शहराच्या सुशोभीकरण मोहिमेचा हा एका भाग असल्याचे सांगितले जात आहे. या मुळे या अतिप्राचीन धर्मनगरीचे रुपडे बदलून गेले आहे. वाराणसी भेटीवर येणाऱ्या पर्यटकांना हा एक सुखद धक्का आहे.


शहरातील तसेच शहराबाहेरील अनेक चित्रकार, पेंटर या कामात व्यग्र झाले असून विविध सुंदर चित्रांसोबत सामाजिक संदेशही दिले जात आहेत. शहराची प्रत्येकी भिंत काही ना काही कहाणी सांगू लागली असून त्यातून वाराणसीचा इतिहास प्रतीत होत आहे.


या चित्रातून बाबा विश्वनाथ, गंगेचे घाट, बुद्ध, रामनगर किल्ला अशी अनेक चित्रे रंगविली गेली आहेत. शहराच्या अनेक पडीक जागा ब्राईट आणि सुंदर चित्रांनी सजल्या आहेत. पर्यटकांना या चित्रांचे फोटो काढण्याचा मोह आवरता येणे अवघड बनल्याचे दृश्य सध्या सर्वत्र दिसते आहे.

Leave a Comment