
अभिनेता आदित्य रॉय कपूर याने आशिकी 2 या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. पण आता तो सध्या त्याच्या प्रेमप्रंपचामुळे चर्चेत आला आहे. अनेकदा दिवा धवनसोबत आदित्यला स्पॉट केले गेल्यामुळे ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकू लागले. पण या जोडीने हे वृत्त वारंवार फेटाळले आहे.
पुढच्या वर्षी विवाहबद्ध होणार आदित्य रॉय कपूर?
आदित्य नेहमीच दिवा केवळ आपली चांगली मैत्रिण असल्याचे म्हणत होता. पण आता समोर आलेल्या वृत्तानुसार लवकरच दिवासोबत आदित्य साखरपुडा करणार असून ही जोडी पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
नुकताच कलंक चित्रपटातून आदित्य प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तो आता सडक चित्रपटाच्या सिक्वेलच्या चित्रीकरणात व्यस्त असून हा चित्रपट १० जुलै २०२०ला रिलीज होणार आहे.
