ट्रिपल तलाक; महिलेला 5 वर्षांच्या मुलीसमोर जिंवत जाळले


एका 22 वर्षीय महिलेला तिहेरी तलाक दिल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केल्याने पाच वर्षांच्या मुलीसमोर जिंवत जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील गाद्रा गावात घडली.

महिलेचे वडिल रमजान खान यांनी आरोप केला आहे की, ‘महिलेचा पति नफिस ( वय 26 ) याने फोनवरून त्यांची मुलगी सईदाला 6 ऑगस्ट रोजी तलाक दिला. नफिज हा मुंबईला राहिला असतो.’

रमजान खान यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ‘सईदा तक्रार दाखल करायला गेली होती, मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यांनी तिला मुंबईवरून नवऱ्याला परत येऊ दे मग बघू, असे म्हणत घरी पाठवले. नफिस 15 ऑगस्टला परतल्यावर दोघांना पोलिसांनी समन्स धाडला व नफिजला सईदाबरोबर राहण्यास सांगितले.’

सईदाची मुलगी फातिमाने पोलिसांना सांगितले की, ‘नमाजवरून परतल्यावर त्यांनी आईला तलाक दिला असून, जायला सांगितले. तिने सांगितले की, माझे आजोबा अजिजुल्ला, आजी हसिना आणि आत्या गुडिया नादिया आले. माझ्या वडिलांनी आईला केस धरून ओढले व आत्याने रॉकेल ओतले व आजी आजोबांनी तिला पेटवलं.’

श्रावस्तीचे एसपी आशीष श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘नफीस आणि तिच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ, हत्या आणि हुंडा निषेध अधिनियमांच्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच 6 ऑगस्टला तक्रार का नोंदवण्यात आली नाही याचीही चौकशी करण्यात येईल.’

Leave a Comment