दिराच्या बर्थडे पार्टीत ट्रान्सपरंट ड्रेस घालून फसली प्रियंका


आपल्या ड्रेसिंग स्टाइलमुळे बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. प्रियंका इव्हेंट असो व्हेकेशन असो वा मग बर्थडे पार्टीत नेहमीच तिच्या हटके लुकमुळे सगळीकडे भाव खाऊन जाते. दरम्यान प्रियंका सध्या अशाच एका ड्रेसमुळे चर्चेत आहे.

नुकताच प्रियंकाचा दीर जो जोनसचा वाढदिवस धडाक्यात साजरा झाला. पण जोच्या बर्थडे पार्टीपेक्षा यावेळी प्रियंकाच्या ड्रेसचीच चर्चा जास्त रंगली. न्यूयॉर्कमध्ये जो जोनसची बर्थडे पार्टी होती आणि बॉन्ड थीम या पार्टीसाठी ठेवण्यात आली होती त्यानुसार मॅचिंग ब्लॅक कपड्यांमध्ये प्रियंका आणि निक दिसले. पण त्यातही सर्वांच्या नजरा प्रियंकाच्या ड्रेसवर खिळल्या होत्या.

प्रियंकाने या पार्टीसाठी ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. तर मॅचिंग ब्लॅक सूटमध्ये निकसुद्धा दिसला. सध्या सोशल मीडियावर जो जोनसच्या बर्थडे पार्टीतील प्रियंकाचा हा ब्लॅक स्वॅग खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे याआधीच अशाच एका ट्रान्सपरंट ड्रेसमुळे ट्रोल झालेल्या प्रियंकाच्या या ड्रेसचे मात्र कौतुक केले जात आहे.

जो जोनसने आपल्या बर्थडे पार्टीसाठी ब्लॅक अँड व्हाइट सूटची निवड केली होती तर त्याची पत्नी सोफी टर्नर ब्लू कलरच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसली. याशिवाय निकचा सर्वात मोठा भाऊ केविन जोनस आणि त्याची पत्नी डॅनिएले जोनस सुद्धा या पार्टीत सहभागी झाले होते. प्रियंका आणि तिच्या दोन्ही जावांमध्ये नेहमीच खास बॉन्डिंग पाहायला मिळते. त्या नेहमीच एकमेकींच्या बहीणींप्रमाणे एंजॉय करताना दिसतात.

Leave a Comment