रजनीकांतने इंडस्ट्रीमध्ये पुर्ण केले 44 वर्ष, सोशल मीडिया झाला ‘रजनीमय’


सुपरस्टार रजनीकांत यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 44 वर्ष पुर्ण केली आहेत. यानिमित्तीने रजनीकांत यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. #44YrsOfUnmatchableRAJINISM द्वारे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

रजनीकांत यांनी 25 व्या वर्षी अपूर्व रागंगल चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात कमल हासन आणि श्रीविद्या हे देखील होते. हा चित्रपट 1975 मध्ये आला होता. त्यांनी साउथ चित्रपटांबरोबर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये का काम केले आहे.

रजनीकांत यांनी 1992 मध्ये ‘अंधा कानून’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याने ‘चालबाज’, ‘बुलंदी’ सारखे सुपरहीट चित्रपट दिले. नॉर्थ इंडियामध्ये त्यांचे करोडो चाहते आहेत. शिवाजी, पेट्टा, काला, 2.0 सारखे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. त्यांचा पुढील चित्रपट दरबार 2020 मध्ये रिलीज होणार आहे.

रजनीकांतने पहिल्यांदा तिहेरी भूमिका ‘मुंदरू मूगम’ या चित्रपटात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना तामिळनाडू सरकारच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता. 1985 मध्ये त्यांनी 100 चित्रपट पुर्ण केले होते.

12 डिसेंबर 1950 ला बैग्लोरमध्ये जन्म घेणाऱ्या रजनीकांत यांचे कहानी रोचक आहे. अभिनेता बनण्याआधी ते बैग्लोरमध्ये एक बस कंडक्टर होते. पाच वर्षांचे असतानच त्यांच्या आईचे निधन झाले.  आज त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. रजनीकांत यांना खाण्या पिण्याची देखील खूप आवड आहे.

एवढे मोठे स्टार झाल्यानंतर देखील आजही रजनीकांत आपल्या जुन्या दिवसांना विसरलेले नाहीत. आजही अनेकदा ते गरिबांना मदत करत असतात.

 

Leave a Comment