राम गोपाल वर्मावर शर्लिन चोप्राचा कास्टिंग काऊचा आरोप


सध्या इंस्टाग्रामवर आपले हॉट फोट शेअर करुन चर्चेत असणारी मॉडेल अभिनेत्री शर्लिन चोप्राने प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. हे गंभीर आरोप शर्लिनने कास्टिंग काउचसंदर्भात केले असून तिने राम गोपाल वर्मा यांनी आपल्याला अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे.

मी माझ्या काही फोटोंची एक प्रोफाइल २०१६ मध्ये राम गोपाल वर्मा यांना पाठविली होती. ते त्यासोबतच कोणता चित्रपट करत असल्याचे विचारुन त्यांच्या चित्रपटात तिने काम करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले होते. मी त्यांचे ‘सत्या’, ‘कंपनी’ हे चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची चाहती झाल्याचेही सांगितल्यानंतर मला एक स्क्रिप्ट त्यांनी पाठवली आणि या चित्रपटात काम करायला आवडेल की नाही ते कळव, असे त्यांनी सांगितले. पण केवळ सेक्स सीनविषयीच त्या स्क्रिप्टमध्ये लिहिण्यात आले होते.

ती पुढे म्हणते, मला या स्क्रिप्टनंतर त्यांचा एक मेल आला. चित्रपटाच्या कथेऐवजी या मेलमध्ये एक अश्लील व्हिडीओ होता. मी तो व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना याप्रकरणी जाब विचारला. त्यावर जर तुझी संमती असेल तर आपण पुढे जाऊ शकतो असे त्यांनी मला सांगितले. याचवेळी एका अडल्ट चित्रपटाची ऑफरही त्यांनी मला दिली.

Leave a Comment