तुम्ही पाहिली आहे का पांड्या बंधुंची आलिशान गाडी


मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या लॅम्बोर्गिनी ही अलिशान गाडी चालवताना दिसले. हार्दिक तब्बल तीन कोटी, ७३ लाखांच्या या गाडीतून बांद्राच्या रस्त्यांवर ही अलिशान गाडी चालवत होता. तर शेजारी त्याचा भाऊ कृणाल पांड्या बसला होता. हार्दिकने काही महिन्यांपूर्वीच दोन कोटी, १९ लाखांची मर्सिडीज गाडीदेखील खरेदी केली होती.

सध्या सोशल मीडियावर भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीतून हार्दिक आणि कृणाल फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण पांड्या बंधूंपैकी कोणी ही गाडी खरेदी केली आहे का? याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही.

सोशल मीडियावर हार्दिक किंवा कृणाल यांच्यापैकी कोणीही या गाडीचे फोटो शेअर केले नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीला लॅम्बोर्गिनी हुराकन इव्हीओ ही गाडी भारतात लॉन्च करण्यात आली. ही गाडी सध्या एकाच रंगामध्ये उपलब्ध आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच आयपीएलचे दोन हंगाम खेळणारा फलंदाज शुभमन गिल याने देखील आलिशान रेंज रोव्हर खरेदी केली होती. सचिन तेंडुलकरची मुलगी साराने नवीन रेंज रोव्हरबद्दल अभिनंदन केल्यावर शुबमन गिल चर्चेत होता.

Leave a Comment