‘राम मंदिराच्या पायाभरणीत सोन्याची वीट देऊ’


नवी दिल्ली – अयोध्येत राम मंदिरांचे निर्माण करण्यात यावे अशी इच्छा शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी जाहीर केली आहे. राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट जर आमच्या परिवाराकडून ठेवली जाईल. त्याचबरोबर सोन्याची वीट राम मंदिर बांधण्याकरिता दान देऊ, असे तुसी म्हणाले आहेत. नुकतीच तुसी यांनी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद वादावर आपले मांडण्याची याचिका दाखल केली होती. पण ही याचिका न्यायालयाने स्विकारली नव्हती.

अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी जागा द्यावी अशी विनंती देखील हैदराबादमध्ये राहणारे मुघल राजघराण्याचे वंशज तुसी यांनी केली आहे. अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेच्या मालकीची कागदपत्रे कोणाकडेही नाहीत. पण मुघल शासकांचा वंशज या नात्याने ती जमीन कोणाला दिली जावी याविषयी मत व्यक्त करण्याचा हक्क तरी मला नक्कीच आहे. न्यायालयाने जर मला तशी परवाणगी दिली तर अयोध्येतील सर्व वादग्रस्त जमीन मी राम मंदिर बांधण्यासाठी परत देईन असेही तुसी म्हणाले आहेत.

Leave a Comment