पाच हजार रुपयांच्या आता फिरू शकता ही पर्यटनस्थळे


आपल्या पैकी अनेकजणांच्या मनात मनसोक्त पर्यटन करण्याची इच्छा असते. पण काही आपल्याजण बजेटमुळे आपला हात आखूडता घेत, पर्यटनाचा विषय टाळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यटनस्थळांबाबत सांगणार आहोत, ज्याठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये देखील मनसोक्त आनंद घेऊ शकता.

शिमल्यातील कुफरी हे कमी पैशांमध्ये फिरायला जाण्यासाठी एक उत्तम पर्यटनस्थळ असून येथे दोन दिवस आणि दोन रात्रीचे पॅकेज घेता येते. त्याचबरोबर हे पर्यटन आपल्या बजेटमध्ये अर्थात 5 हजार रुपयांच्या आत होऊ शकते. येथे राहणे, फिरणे आणि खाणे या सर्व गोष्टी एवढ्या पैशांमध्ये सहज होतील.

मध्य प्रदेशमधील पचमढी हेही देखील कमी बजेट असलेल्यांसाठी उत्तम ठिकाण आहे. खिशाला परवडणारी अनेक हॉटेल येथे आहेत. त्याचबरोबर तिथेच तुमची खाण्या-पिण्याची देखील सोय होऊ शकते. अशात या जागेचा तुम्ही कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी नक्कीच विचार करू शकता.

हिमाचल प्रदेशमधील कसोल हे ठिकाणही खूप सुंदर पर्यटनस्थळ आहे. विशेष म्हणजे नयनरम्य असे हे ठिकाण चंडीगढ आणि मनालीच्या मधील एक हिल स्टेशन आहे. बॅचलर्ससाठी हे आवडते डेस्टिनेशन आहे. येथे परवडणाऱ्या दरात अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पीक सीजन नसेल तर येथे 800 रुपयांमध्येही हॉटेल मिळू शकते.

जेव्हा आपण लो बजेटचा विचार करतो तेव्हा तेव्हा राजस्थानला विसरून कसे चालेल. येथे जयपुरला फिरण्यासारख्या अनेक जागा आहेत. तसेच राजस्थानमध्ये कमी बजेटमध्ये खाण्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

Leave a Comment