
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो गुगलवर ‘भिकारी’ असे सर्च केल्यानंतर समोर येत असून इम्रान खान यांची दाढी वाढलेली गुगलवर दिसत असलेल्या फोटोमध्ये दिसत असून इम्रान खान हातात वाडगे घेऊन भीक मागताना दिसत आहेत. इम्रान खान यांच्या फोटोशी छेडछाड केली असून त्यांना गुगलवर ट्रोल केले जात आहे.

सध्या आर्थिक संकटाचा सामना पाकिस्तान करत आहे. इम्रान खान यांनी त्यावर मात करण्यासाठी अनेक देशांकडे मदतीचा हात मागितला आहे. इम्रान खान यांच्या फोटोशी छेडछाड पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दाखवण्यासाठी केल्याचे म्हटले जात आहे.
गुगलवर ‘भिकारी’ सर्च करताच दिसतो या पंतप्रधानाचा फोटो
इम्रान खान यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. इम्रान खान यांचे अनेक मिम्स तयार करून नेटकऱ्यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमागे भारतीय नेटकरी असल्याचे पाकिस्तानमधील नेटकऱ्यांनी म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीने गुगल अल्गोरिदम किंवा गूगल बॉम्बिंगशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असणार आहे.
