आतापर्यंत 7 फलंदाजांना जोफ्रा आर्चरने केले जायबंदी


सध्या क्रिकेट जगतात इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भल्याभल्या फलंदाजांची त्याच्या गतीमुळे घाबरगुंडी उडाली आहे.

जोफ्राने आपल्या गतीच्या जोरावर टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांना उध्वस्त केल्यानंतर आता तो आपला दम कसोटी क्रिकेटमध्ये दाखवत आहे. पण फलंदाजांसाठी त्याची गोलंदाजी कर्दनकाळ ठरत आहे.

ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाने जोफ्रा आर्चरला संधी दिली. फॉर्ममध्ये असलेला स्मिथ यावेळी 80 धावांवर खेळत असताना स्मिथच्या मानेवर आर्चरचा वेगवान चेंडू आदळला. तो तेव्हा मैदानावरच कोसळला. स्मिथ बराच काळ बेशुध्द अवस्थेत असल्यामुळे स्मिथ जखमी निवृत्त झाला.

दरम्यान आर्चरच्या गोलंदाजीनं अशी परिस्थिती झालेला स्मिथ पहिला फलंदाज नव्हे, याआधी आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्ये आर्चरनं अनेक फलंदाजांची अशी अवस्था केली आहे. दरम्यान स्मिथला पर्याय म्हणून आलेला मार्नस लाबुशेन पहिल्या चेंडूवर आर्चरचा शिकार झाला. त्याच्या तोंडावर पहिलाच चेंडू आदळल्यानंतर लाबूशेनला लगेचच फिजिओची मदत घ्यावी लागली.

याआधी राजस्थानक़डून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जोफ्रा आर्चरने चेन्नई सुपरकिंग्ज विरोधात झालेल्या सामन्यात धोनीला आर्चरने आपले शिकार केले. धोनी चेंडू हेल्मेटला लागल्यामुळे थोडक्यात बचावला होता.

विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या सामन्यातही असाच प्रकार घडला. आर्चरचा एक चेंडू हाशिम अमलाच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले.

विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात अॅलेक्स कॅरीसोबतही असाच भयंकर प्रकार घडला. जोफ्राचा एक चेंडू अलेक्स कॅरीच्या हनुवटीला चेंडू लागल्याने भयंकर रक्तस्राव झाला होता. पण अशा परिस्थितही कॅरीने सामना खेळला.

Leave a Comment