
अभिनयाबरोबर लुक्स आणि फिटनेससाठी बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध असलेल्या हृतिकच्या देखणेपणावर पुन्हा एकदा अमेरिकन एजन्सीने मोहोर उठविली आहे. मोस्ट हँडसम मॅन इन द वर्ल्ड साठी हृतिकची शिफारस या संस्थेने केली असून क्रिस इवांस, डेव्हिड बेकहम, रोबर्ट पॅरीसन्स, उमर बोर्कान अल गाला या हॉलीवूड स्टार्स आणि प्रसिद्ध खेळाडूना मागे टाकत हृतिकने या यादीत टॉप पोझिशन मिळविली आहे. अर्थात यापूर्वीही हृतिक याच खिताबासाठी निवडला गेला होता आणि बॉलीवूड मध्ये त्याला ग्रीक गॉड टायटल दिले गेले आहेच.
हृतिक पुन्हा ठरला जगातील सर्वात देखणा पुरुष
बॉक्स ऑफिस इंडियानुसार यंदा ऑगस्ट २०१९ मध्ये टॉपमोस्ट हँडसम मॅन मध्ये हृतिक अग्रणी स्थानावर आहे. हृतिकसाठी सध्याचा काळ चांगला आहे कारण त्याचा सुपर ३० चित्रपट सुपरहिट ठरला आहे. तसेच वॉर या आगामी चित्रपटात तो टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर याच्याबरोबर प्रथमच झळकणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०१९ ला प्रदर्शित होत असून हृतिक सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या रिमेक मध्येही भूमिका साकारत आहे.
