टकलू असतात अधिक आकर्षक आणि हुशार


कुणाही पुरुषाला आपल्याला टक्कल पडू नये असे वाटते आणि ज्यांचे केस गळायला सुरवात झालेली असते असे पुरुष नानाविध उपायांनी आपला केशसंभार सुरक्षित राहील याची काळजी घेतात असे दिसून येते. मात्र नवीन संशोधनातून सिध्द झालेली एक गोष्ट टकलूंसाठी खूपच दिलासा देणारी ठरणार आहे.

जेफ स्टेथम, जेफ बेजोस आणि ब्रूस विलीस या तीन प्रसिद्ध व्यक्तीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. हे तिघेही आयुष्यात यशस्वी आहेत आणि त्यातले दोघे हॉलीवूड सुपरस्टार आहेत तर बेजोस जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. या तिघातील आणखी एक साम्य म्हणजे तिघेही टकलू आहेत. आता काही लिंक लागते का पहा ! युनिव्हर्सिटी ऑफ पेनान्सिल्व्हिया मधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे आढळले की, जगात टक्कल असणारे पुरुष अधिक यशस्वी आणि प्रभावशाली आहेत. संशोधक अल्बर्ट यांनी हे संशोधन केले. ते स्वतः टकलू आहेत. त्यांनी या अभ्यासात लोकांना टकलू लोकांचे फोटो दाखवून त्यावर प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या. यात सहभागी झालेल्यांना एकाच पुरुषाचा केस असतानाचा आणि टक्कल असतानाचा असे फोटो दाखविले गेले तेव्हा बहुतेकानी टक्कल असलेले पुरुष अधिक आकर्षक, मजबूत असल्याचे सांगितले.


युनिव्हर्सिटी ऑफ सारलांड मधील सायकोलॉजिस्ट रोनाल्ड यांनी यावर जागतिक रिसर्च केला त्यात २० हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यातही टकलू अधिक हुशार, प्रगल्भ असल्याचे दिसून आले. जे पूर्ण टकलू नाहीत किंवा मुद्दाम केस कापले आहेत त्यांच्यापेक्षाही खरे टकलू यात वरचढ ठरले. पूर्वी टकलू सेक्शुअली अधिक सक्षम असतात असा एक समज होता कारण केस गळण्यामागे टेस्टेस्टेरॉनची पातळी कारणीभूत असते असे मानले जात होते. हे मेल सेक्स हार्मोन आहे. मात्र नवीन संशोधनात या हार्मोनचा केस गळण्याशी काही संबंध नाही तर केस गळून टक्कल पडण्यामागे डीहायड्रोटेस्टेस्टेरॉन कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment