फिरोजशाह कोटला मैदानावर विराट कोहली स्टँड


आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याची लक्षणीय कामगिरी लक्षात घेऊन दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघ म्हणजे डीडीसीएने फिरोजशाह कोटला मैदानातील एका स्टँडला विराट कोहली याचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर माजी गोलंदाज आणि कप्तान बिशनसिंग बेदी आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या नावाचे स्टँड आहेतच पण त्यांना हा सन्मान त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दिला गेला आहे. डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले, विराट या संदर्भात म्हणजे स्टँडला नाव देण्याचा संदर्भात सर्वात तरुण आणि सक्रीय क्रिकेटर आहे.

शर्मा म्हणाले, विश्वकप सामन्यात विराटने शानदार योगदान दिले आहे त्याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि तो आमचा गौरव आहे. कप्तानपदावर त्याने अनेक रेकॉर्ड नोंदविली आहेत आणि त्याचा सन्मान करण्यात आम्हाला आनंद वाटतो. या मैदानाला वीरेंद सेहवाग आणि अंजुम चोप्रा यांच्या नावाची गेट्स आहेत तर हॉल ऑफ फेमला माजी कप्तान पतौडी यांचे नाव आहे. डीडीसीए १२ सप्टेंबरला टीम इंडिया सदस्यांचा जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गौरव सोहळा करणार आहे. कोहली यांच्या नावाचा स्टँड युवा क्रिकेटर्सना प्रेरणा स्रोत ठरेल अशी अपेक्षाही शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली. शर्मा म्हणाले टीम इंडियाचा केवळ कप्तानच नाही तर शिखर धवन आणि ऋषभ पंत आणि इशांत शर्मा हे दिल्लीचे खेळाडू आहेत.

Leave a Comment