या 99 वर्षांच्या आजोबांचा डान्स चँम्पियनशीपमध्ये सहभाग


आयुष्यात मौजमज्जा करायला, आयुष्य मजेत जगण्याला वयाच्या मर्यादा नसतात. हेच एका 99 वर्षीय आर्यलंडच्या व्यक्तीने दाखवून दिले आहे. 99 वर्षीय व्यक्तीने अर्जेटिंनाच्या बुईनो एअर्स वेन्यु येथे झालेल्या वर्ल्ड टाँगो चँम्पियनशीपमध्ये परफॉर्मस करत सगळ्यांची वाहवाह मिळवली. जेम्स मॅकन्स यांनी सांगितले की, टाँगोमुळे मला खूप आनंद मिळतो. डान्स हा समाजासाठी महत्त्वाचा आहे.

टाँगो डान्सचा चाहता असलेल्या या व्यक्तीने अटलांटिकच्या प्रवासासाठी पैसे जमवले आहेत. या वृध्दाने टाँगो डान्स हा केवळ एकदाच 2002 मध्ये केला होता. त्यावेळीही त्यांचे वय 80 पेक्षा अधिक होते. पांढरे जँकेट, काळी पँट आणि टाय परिधान करत पार्टनर लुसिया सेवाबरोबर त्यांना शानदार डान्स केला. या कपल्ससाठी सभागृहात सर्वाधिक टाळ्या वाजल्या. 2019 मध्ये झालेल्या या चँम्पियनशीपमध्ये 36 देशांमधून 744 कपल्सनी भाग घेतला होता.

Leave a Comment