त्या व्यक्तीने एकट्याने केलाच नाही विमान प्रवास


काही दिवसांपुर्वी न्युयॉर्कमधील दिग्दर्शक विन्सेंट पिओनेला एकट्याला विमानात प्रवास करण्याची संधी मिळाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पिओने जेएफके विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या डेल्टा फ्लाइटमध्ये एकमेव प्रवासी होता. याबाबतचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र आता डेल्टा एअरलाइन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, विमानात तो एकटाच प्रवासी असला तरी देखील, त्या विमानाने उड्डाणच घेतले नव्हते.

डेल्टा फ्लाइट 3652 या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही तांत्रिक उडचणीमुळे ते उड्डाण थांबवण्यात आले होते. काहीवेळानंतर विमानाने उड्डाण घेतले त्यावेळी विमानात एकही प्रवाशी नव्हता असे, डेल्टाचे प्रवक्ते एंथनी ब्लँक यांनी स्पष्ट केले आहे.

याआझी पिओनेने प्रवासाबद्दल केलेल्या ट्विटला डेल्टाने उत्तर देत ‘चांगला अनुभव’ असे म्हटले होते. त्यानंतर हे ट्विट व्हायरल झाले होते.

मात्र आता डेल्टाकडून आलेल्या नवीन स्पष्टीकरणाला उत्तर देताना पिओनेने हा व्हिडीओ खरा असल्याचे म्हटले आहे. पिओनेने फेसबूकवर लिहिले की, माझा व्हिडीओ 100 टक्के खरा आहे. काही तांत्रिक कारणामुळे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते पुन्हा थांबवण्यात आले होते. तो व्हिडीओ मी, मज्जेशीर, प्रेरणादायी स्टोरी सांगण्यासाठी काढला होता. असे करणे मला आवडते. असे त्यांने सांगितले.

पिओनेने शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी बघितले आहे. त्याने विमानातील फोटो देखील शेअर केले होते.

Leave a Comment