ग्राहकांची डिस्काउंटची खोड मोडणार रेस्टोरंट्स!


एका क्लिकवर ऑनलाइन फूड ऑर्डर करणे आता अनेक जणांच्या दररोजच्या जीवनाचा भाग झाले आहे. ऑनलाइन फूट ऑर्डर करण्याचा आणखी फायदा मोठ्या प्रमाणात डिस्काउंट हा असतो. मात्र आता या डिस्काउंटच्या विरोधात रेस्टोरंटनेच पाऊल उचललेले आहेत. गुरग्राममधील 300 पेक्षा अधिक रेस्टोरंट्सनी फूड डिल्हिवरी अ‍ॅपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

डिस्काउंटमुळे रेस्टोरंट चालवण्यास अवघड जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नॅशनल रेस्टोरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे अध्यक्ष राहुल सिंहने सांगितले की, भाडे वाढणे आणि इनपूट टँक्स मिळत नसल्याने रेस्टोरंटला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. फूड डिल्हिवरी अॅपद्वारे कधीही डिस्काउंट देण्यात येत असल्याने अधिकच समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व रेस्टोरंट एकत्र येत ग्राहकांची डिस्काउंटची सवय बंद करण्याच प्रयत्न करत आहेत.


या रेस्टोरंट्सनी फूड अॅप झोमॅटो (गोल्ड), इजी डिनर (प्राईम) मेंबरशिप प्रोग्राम विरोधात सोशल मीडियावर #LogOut असे कॅम्पेन देखील चालवले. तसेच त्यांनी म्हटले आहे की, आम्ही येथे एक चांगला अनुभव देण्यासाठी आहोत.मात्र झोमॅटो गोल्ड, ईजी डिनर, मॅजिकपिन, नियरबाय सारख्या सर्विस चुकीच्या पध्तीने व्यवसाय करत असून, त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. आमच्याकडे विरोध म्हणून अॅपमधून बाहेर पडण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता.

तसेच त्यांनी म्हटले आहे की, इतर शहरातील हॉटेल्सनी देखील यामधून बाहेर पडावे. फर्स्ट फिड्ल रेस्टोरंट्सचे चीफ एग्जिक्युटिव प्रियांक सुखीजा यांनी सांगितले की, आमच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला आहे. आम्ही ग्राहकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देऊ शकत नाही.

तर दुसरीकडे फुड अॅप्सचे म्हणणे आहे की, हे कॅम्पेन एवढे महत्त्वाचे नसून, याचा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही.

Leave a Comment