‘या’ खानने अक्षयच्या मिशन मंगलवर ओकली गरळ


यंदाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्टला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा बहुचर्चित मिशन मंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडेदेखील चांगले आहेत. तसेच हा अक्षयच्या करिअरमधला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग करणारा चित्रपटही ठरला आहे. पण बॉलिवूडच्या स्वयंघोषित समीक्षकाला हा चित्रपट म्हणजे ‘इस्रो’च्या वैज्ञानिकाचा अपमान असल्याचे वाटत आहे. त्याने अक्षय कुमारला आपल्या ट्विटद्वारे चांगलाच टोलाही लगावला आहे.

या स्वयंघोषित समीक्षकाचे नाव कमाल आर. खान असे असून नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कमाल खान चर्चेत असतो. त्यामुळेच आता अक्षय कुमारबाबतही त्याने ट्विट करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न केला आहे.


तो ‘मिशन मंगल’ चित्रपटाबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हणतो, या चित्रपटामध्ये मंगळयानावर काम करणाऱ्या वैज्ञानिकांचा अपमान करण्यात आला आहे. यानावर काम करणारे वैज्ञानिक हे चित्रपटात विनोदी रूपात सादर करण्यात आले आहेत. आपल्या आयुष्यात जे अपयशी असतात. पण ते योगायोगाने मंगळयान लॉन्च करुन देतात. ‘इस्रो’ने अशाप्रकारे वैज्ञानिकांचे वर्णन करण्यासाठी अक्षय कुमारला कशी परवानगी दिली, असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर त्याने आणखी एका ट्विटमध्ये अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. मी कधीच हा विचार केला नव्हता की मला एक विदेशी एवढा मजबूर करेल, की त्याचा चित्रपट पाहायला मला जावे लागले. माझ्याच देशाचा जो अपमान करतो आणि मी त्याच्या चित्रपटाला चांगले म्हणावे. मी जर असे केले नाही, तर मला सरळ देशद्रोही ठरवले जाईल आणि मला पाकिस्तानात पाठवून दिले जाईल. दरम्यान कमाल खानच्या या ट्विटवर अक्षयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याला अक्षयच्या चाहत्यांनी धारेवर धरले आहे. त्याच्या या ट्विटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Comment