महेंद्रसिंह धोनीची ट्रेनिंग 15 ऑगस्टला पुर्ण झाली आहे. धोनी 31 जुलैपासून काश्मीरमध्ये सैन्याबरोबर कार्यरत होता. यादरम्यान ट्रेनिंग करत असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
धोनीचा व्हायरल होणारा हा फोटो 23 ऑगस्ट 2016 चा असून, त्याने हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.
हा फोटो अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा फोटो देखील आताचा असल्याचा दावा करत व्हायरल केला जात आहे. मात्र धोनीने हा फोटो 4 जून 2014 ला इंस्टाग्रावर पोस्ट केला होता.
हा आणखी एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो 23 ऑगस्ट 2016 ला धोनीने इंस्टाग्रावर पोस्ट केला होता. धोनी सैन्याच्या गणवेशात अनेक वेळा दिसला आहे. जेव्हा त्याला पद्म पुरस्कार मिळाला होता. तेव्हाही त्याने सैन्याच्या गणवेशातच स्विकारला होता. धोनी ज्या विक्टर फोर्सबरोबर काश्मीरमध्ये कार्यरत होता तो आंतकवादी प्रभावित जिल्हा आहे.
धोनीने पूर्ण केले आपले सैनिकी प्रशिक्षण
धोनीला लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे. २०११ सालीच लष्कराने त्याला हा सन्मान दिला. तो पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे.