सिद्धार्थ-प्रथमेशच्या आगामी खिचिकचे नवे पोस्टर रिलीज


एका आगामी मराठी चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब दोघेही एकत्र येणार असून आता दोन विनोदी कलाकार एकाच चित्रपटात झळकणार असल्यामुळे त्या चित्रपटाचे नाव देखील हटकेच असायला हवे. त्यामुळेच त्यांच्या आगामी चित्रपटाचे ‘खिचिक’ असे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

प्रथमेशचा हटके लूक ‘खिचिक’च्या टीजरमध्ये पाहायला मिळाला. या चित्रपटात नात्यांची अनोखी कथा पाहायला मिळणार आहे. फारसे काही चित्रपटाच्या नावातून कळत नसल्यामुळे चित्रपटाची कथा अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.


आता सिद्धार्थचाही आगळावेगळा लूक चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळत असल्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे. या चित्रपटाचे पोस्टर सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून त्याला ‘ईच‌क वाचक करीत समद्यांना शोधायले येऊन राहिलाय.. खिचिक!’, असे कॅप्शनही त्याने या पोस्टरला दिले आहे.

Leave a Comment