माहिती अधिकारात उघड झाला एक खड्डा बुजवण्याचा भला मोठा खर्च


मुंबई – पावसाळा आला की मुंबईतील खड्डे दरवर्षी प्रमाणे आपले डोकेवर काढतात. त्यामुळेच मुंबईच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरुन रस्त्याचे काम किती चांगल्या पद्धतीने केले आहे याचा अंदाज येतो. रस्त्यांना दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. अनेक दुर्घटना रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे घडल्याचे समोर आले आहे. तरीही मुंबईत फक्त 414 खड्डे बुजवण्याचे काम बाकी असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.

पण मुंबईतील एक खड्डा बुजवण्यासाठी 17, 693 रुपये खर्च येत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यानुसार गेल्या सहा वर्षात किती खर्च झाला असेल याचा विचार करणे सुद्धा अशक्य आहे. 2013 ते 2019 पर्यंत खड्डे बुजवण्यासाठी किती खर्च आला याबद्दल उघड झालेल्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षात एकूण महापालिकेच्या बजेटमध्ये 3981 खड्डे बुजवण्यासाठी 175 करोड 51 लाख 86 हजार रुपयांची तरदूत करण्यात आली होती. त्यानुसार एकूण 4898 खड्डे बुजवले गेले पण त्यासाठी 7 कोटी 98 लाख 7 हजार रुपये खर्च करण्यात आले.

या अहवालानंतर प्रत्येक वर्षाला 90 ते 100 खड्डे महापालिकेने बुजवले असल्याचा दावा केला आहे. पण रस्त्यांची स्थिती पाहता एवढे कोटी खर्च करुनही जशीच्या तशीच आहे. उघड झालेली ही माहितीनंतर मुंबईतील वॉर्डनुसार याबद्दल सांगितल्यास त्यासाठी किती खर्च करण्यात आला असेल याचा विचारसुद्धा करवत नाही. महापालिकेच्या या प्रकारामुळे भ्रष्टाचार होत असल्याची टीका विरोधी पक्ष आणि आरटीआय कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Leave a Comment