व्हॉट्सअ‍ॅप लावणार अल्पवयीन मुलांच्या अकाऊंटवर लगाम


व्हॉट्सअ‍ॅप अल्पवयीन मुलांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा असून व्हॉट्सअ‍ॅप वयाची अट पूर्ण न केलेल्या अकाऊंटवर बंदी घालण्याचा प्रयत्न येत्या काळात कंपनीचा असणार आहे.

कंपनीच्या नियमाप्रमाणे युरोपीय देशांतील युजर्ससाठी किमान वयोमर्यादा ही १६ वर्षे होती. तर युरोप वगळता इतर देशांतील युजर्ससाठी किमान वयोमर्यादा ही १३ वर्षे आहे. पण आता १३ वर्षांहून लहान मुले देखील हे अ‍ॅप वापरत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वयाची अट पूर्ण न करणाऱ्या युजर्सचे अकाऊंट करणार असल्याचे समजत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी भारतीयांसाठी खास “frequently forwarded” हे फीचर आणले होते. याच अ‍ॅपच्या माध्यमांतून गेल्या काही वर्षांत अनेक अफवांचे आणि खोटे मेसेज फॉरवर्ड होण्याचे प्रमाण वाढले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने यावर तोडगा काढण्यासाठी “frequently forwarded” हे फीचर आणले आहे.

Leave a Comment