फुकट कार मागणाऱ्या ट्विटर युजरला आनंद महिंद्रा यांचे भन्नाट उत्तर!


सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे खूप सक्रीय असतात. आतापर्यंत अनेकांचे लक्ष त्यांच्या वेगवेगळ्या ट्विट्सनी वेधून घेतले आहे. त्यांनी अशाच एका खोडसाळ ट्विटर युजरला दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


आनंद महिंद्रा यांच्याकडे विपूल नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विटच्या माध्यमातून एक मागणी केली. सर, तुमचा मी खूप मोठा फॅन आहे. मला तुमच्या कंपनीची महिंद्रा थार तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकाल का, असा प्रश्न या युजरने विचारला.

आनंद महिंद्रा त्याला उत्तर देताना म्हणाले, आजच्या दिवसातील महत्त्वाचा शब्द म्हणजे अतिआत्मविश्वास. विपूलवर तुम्ही प्रेम करा किंवा त्याचा द्वेष करा. पण त्याच्या अतिआत्मविश्वासाची दखल घ्यावी लागेल. त्याला त्यासाठी पूर्ण मार्क द्यावे लागतील. पण मी तुझी मागणी काही पूर्ण करू शकत नाही विपूल. कारण त्यामुळे माझा धंदाच बंद होईल.

Leave a Comment