पूरग्रस्त भागातील हजारो मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार मराठमोळी अभिनेत्री


मुंबई : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद फाऊंडेशनच्या वतीने 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून दीपालीने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून लोकांची भेट घेतली.

यावेळी दिपालीने पूरग्रस्त भागातील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतल्याचेही जाहीर केले आहे. 50 हजार रुपयांची मुदत ठेव पावती प्रत्येक मुलीच्या नावाने करण्यात येणार आहे. अशा एकूण हजार मुलींचा विवाह करून देण्याची जबाबदारी दीपालीने स्वीकारली आहे.

दीपालीने याआधी देखील अहमदनगरमधील साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू करावे या मागणीसाठी बेमुदत उपोषण केल्यानंतर दीपालीने आपले उपोषण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले. श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील ३५ दुष्काळी गावांना या योजनेमुळे फायदा होणार आहे.

Leave a Comment