विभक्त होणार करिना कपूर !


बॉलीवूडची बेबो अर्थात करिना कपूर ही विभक्त होणार आहे. पण जरा थांबा… कारण तुमच्या डोक्यात वेगवेगळ्या प्रश्नांचा भाडीमार सुरु होत असेल तर तो थांबवा. त्याचे असे आहे की, कोणत्याही क्षेत्रातील कलाकार असो त्यांची महत्वाची कामे करण्यात त्यांच्या व्यवस्थापकांची फार मोलाची भूमिका असते. त्यांना स्टार बनवण्यात त्यांचा खूप मोठा असतो. जितके प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, त्यापेक्षाही अधिक काम त्यांच्या व्यवस्थापकांना काम करावे लागते.

आता खरी बातमी येथे सुरु होत आहे. करीना कपूर आणि काही वर्षांपासून तिच्या सोबत काम करणाऱ्या पूनम दमानिया बद्दल आज आपण बोलत आहोत. करीना कपूरची जवळपास १० वर्षे पूनम मॅनेजर होती, पण आता करीना कपूर आणि तिची मॅनेजर पूनम यांनी सहमतीने एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरविले आहे.

करीना कपूर सोबत रेश्मा शेट्टीची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स अंतर्गत पूनम ही जोडली गेली होती. पण ती या कंपनीपासून आता विभक्त झाली आहे. हेच कारण आहे की, यापुढे करीना कपूरच्या व्यवस्थापनाची ती कामे हाताळणार नाही. दरम्यान, अशी बातमी पुढे आली आहे की, स्वत:ची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी पूनम उघडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटी मॅनेजमेंट एजन्सी क्वानमध्ये पूनम सहभागी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त मीडिया हाऊसेसमध्ये आहे.

करीनाचे जवळपास सर्वच कामे पूनम पाहत होती. यात एंडोर्समेंट डील, चित्रपटांचे व्यवस्थापन, फोटोशूट्सचे ग्लॅमरस फोटो आणि सैफ आणि तैमूरसमवेत फॅमिली व्हेकेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करायची. दरम्यान, ती विभक्त होत असली तरी व्यावसायिकदृष्ट्या वेगळे होऊनही करीना आणि पूनमच्या वैयक्तिक नात्यावर परिणाम होणार नाही.

Leave a Comment