अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांची काही खास भाषणे


भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज प्रथम पुण्यतिथी आहे. मागील वर्षी दिर्घकाळ आजाराने त्यांचे एम्स हॉस्पिटलमध्ये वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष  जेपी नड्डा आणि अन्य मंत्र्यांनी सदैव अटल या स्मारकावरू जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे तीन वेळा पंतप्रधान होते. या त्यांच्या भाषणांनी सभागृह हदरून जात असे. ते पहिल्यांदा 1996 मध्ये 16 मे ते 1 जून, दुसऱ्यांदा 19 मार्च 1998 ते 26 एप्रिल 1999 आणि तिसऱ्यांदा 13 ऑक्टोंबर 1999 ते 22 मे 2004 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.

एकदा विरोधी पक्षांनी आरोप केला होता की, त्यांना सत्तेचा लोभ आहे. या आरोपाला उत्तर देताना अटलजींनी जोरदार उत्तर दिले होते. त्यावेळी त्यांनी भगवान रामचा श्लोक वाचत म्हटले की, – भगवान राम म्हणायचे की, मैं मरने से नहीं डरता, डरता हूं तो सिर्फ बदनामी से डरता हूं.’ त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी  त्यांच्यावर कधीच असे आरोप केले नाहीत. त्यांनी हे भाषण 28 मे 1996 ला आत्मविश्वास प्रस्तावाच्या दरम्यान केले होते. त्यांची भाषणं ऐकायला विरोधी पक्ष देखील शांत बसत असे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाबद्दल सांगतात की, लोक थंडी आणि पावसात देखील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेकवेळा एका जागेवर बसून राहत असे. आणिबाणीच्या काळात वाजपेयी जेलमध्ये होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर सर्व जेलबंद नेत्यांना सोडण्यात आले. प्रचार करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला. दिल्लीमध्ये एक जनसभा होणार होती. जनता पार्टीचे नेते येऊन सभेत भाषणे देत होती. पण सगळे दमलेले होते. तरीही लोक जागेवरून हलले नव्हते. थंडी होती, पाऊस देखील सुरू होता. तेव्हा एका नेत्याने विचारले की, एवढ्या थंडीत देखील लोक ही कंटाळवाणी भाषणं का ऐकत आहेत ? तेव्हा दुसऱ्या नेत्याने उत्तर दिले, अजून अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषण व्हायचे आहे. त्यामुळे सगळे थांबले आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणांची खास शैली  –
बाद मुद्दत के मिले हैं दिवाने, कहने सुनने को बहुत हैं अफसाने।
खुली हवा में जरा सांस तो ले लें, कब तक रहेगी आजादी कौन जाने।

या ओळी ऐकवल्यानंतर त्यांनी सांगितले होते की, दुसरी ओळ त्यांनी लगेच तेव्हाच बनवली होती. एकदा इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावर टिका करताना, ते खूप हात हलवत हलवत बोलतात असे म्हटले होते. यावर उत्तर देताना त्यांनी उत्तर दिले की, ते सर्व तर ठिक आहे, मात्र तुम्ही कधी कोणाला पाय हलवत बोलताना बघितलं आहे का ?

1994 मध्ये संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्यावर भारताची बाजू मांडण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरसिंह राव यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवले होते. त्यावेळी पाकिस्तान नेत्याने म्हटले होते की, काश्मीरशिवाय पाकिस्तान अपुर्ण आहे. यावर उत्तर देताना वाजपेयी म्हणाले होते, पाकिस्तानशिवाय भारत अपुर्ण आहे.

वाजपेयी सर्वांना हसवत भाषण करायचे –
अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांनी विश्वास मतावेळी संसदेमध्ये शानदार भाषण केले होते. त्यावेळी वाजपेयी म्हणाले होते की, हा काही अकस्मिक चमत्कार नाही की आम्हाला एवढी मत मिळाली. हे आमच्या 40 वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. आम्ही लोकांच्या मध्ये गेलो आहोत आणि आम्ही मेहनत केली आहे. आमचा पक्ष 365 दिवस चालणारा पक्ष आहे. निवडणुकीत केवळ मशरूमप्रमाणे निर्माण होणारा पक्ष नाही. ते म्हणाले की, आम्हाला याठिकाणी अशा अवस्थेत यासाठी उभे केले गेले आहे कारण आम्हाला केवळ काही जागा कमी मिळाल्या.

वाजपेयींचे शेवटचे भाषण –
माझ्या प्रिय देशवासियांनो आज देश अशा ठिकाणी उभा आहे जेथून तो एक लांब उडी घेऊ शकतो. भारताला 2020 पर्यंत विकसित राष्ट्र करण्यासाठी संपुर्ण देशातील नागरिकांची इच्छा आहे. जरा मागे वळून पहा, भारत अनेक संकटांचा सामना करत पुढे जात आहे.

बाबरी मस्जिदचे विवादास्पद भाषण –
1992 ला एका रँलीला संबोधित करताना वाजपेयी म्हणाले होते. तेथे (अयोध्येत) टोकदार दगड निर्माण झाली आहेत. त्यावर कोणीही बसू शकत नाही. त्यामुळे जमीनीला समोतल करायला हवे, बसण्या लायक करायला हवे. यज्ञचे आयोजन होईल तेव्हाच काहीतरी निर्माण होईल. मला नाही माहित उद्या तेथे काय होईल. माझी अयोध्येला जाण्याची इच्छा आहे, मात्र मला सांगण्यात आले आहे की, दिल्लीलाच रहा.

संयुक्त राष्ट्रसभेतील ऐतिहासिक भाषण –
वाजपेयींना हिंदी भाषेप्रती प्रेम आहे. 1977 मध्ये परराष्ट्र मंत्री असताना संयुक्त राष्ट्राच्या सभेत हिंदीमध्ये भाषण देत सर्वांचे मन जिंकले होते.

पोखरणमधील अणू चाचण्यांवर केलेले भाषण –
वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने पोखरणमध्ये यशस्वीरित्या अणू चाचण्या केल्या होत्या. यामुळे पाकिस्तानपासून ते अमेरिकेपर्यंत सर्वांचीच झोप उडाली होती. या चाचण्या रोखण्यासाठी अमेरिकेने अनेक प्रयत्न केले मात्र भारताने त्यांना जुमानले नाही. त्यावेळी वाजपेयींनी दिलेले भाषण ऐतिहासिक होते.

Leave a Comment