ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन


मुंबई – मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे वयाच्या ७२ वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्या सिन्हा हृदयविकार, फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होत्या. ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

त्याचबरोबर त्यांनी ‘काव्यांजली’, ‘कबूल है’, ‘चंद्र नंदिनी’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. त्यांची झलक बऱ्याच वर्षांनी अभिनेता सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती.

Leave a Comment