बॉलीवूडकरांनी शेअर केल्या रक्षाबंधनच्या खास आठवणी


भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेले रक्षाबंधन सर्वांसाठीच खास असते. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते बॉलिवूडच्या सेलिब्रेटिजपर्यंत सर्वांसाठीच हा दिवस खास असतो. जाणून घेऊया बॉलिवूडचे कलाकार रक्षाबंधनबद्दल काय विचार करतात.

बहिणींसाठी कोणतीच मर्यादा नाही –  प्रभास
प्रभासने सांगितले, आमच्या येथे रक्षाबंधनचा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. करिअरच्या सुरूवातीला तर मी बहिणींना 10 ते 20 हजार रूपये देत असेल. आता तर ते मला चिडवतात की, आता तू बाहुबली झाला आहेस. आता कोणतीच लिमिट नाही. ते जे काही मागतील ते सर्व द्यायला मी तयार आहे. लहानपणीच्या रक्षबंधनाबद्दल सांगायचे तर त्याच्या खूप आठवणी आहेत. मी एकदा 9वी मध्ये हॉस्टेलवर राहत असल्याने रक्षाबंधनला घरी जाऊ शकत नसल्याने खूप इमोशनल झालो होतो. तेव्हा खूप रडलो होतो.

भाऊ फक्त गिफ्ट मागतात – कंगना राणावत
रक्षाबंधनशी संबंधित आठवणी खूप प्रेमळ आहेत. आम्ही सारे भाऊ-बहिण सर्व एकत्र येत असतो. लहानपणी ते मम्मीकडून 10-10, 12-12 रूपये घेऊन रक्षाबंधनच्या दिवशी मला द्यायचे आणि पैसे परत घेण्यासाठी सर्व माझ्या मागेमागे यायचे. मी रडत आईकडे जात तिला सागांयचे की, भाऊ माझ्याकडून पैसे मागत आहेत. ते सर्व आठवल्यावर चांगले वाटते. माझ्या भावाबद्दल विचारू नका. पुर्ण दिवस माझ्याकडे गिफ्ट्स मागत असतो. त्यांनी मिळून व्हॉट्सअँप ग्रुप देखील बनवला आहे. मी जेव्हा कधी बाहेर जाते. तेव्हा ग्रुपमधील सर्व डिमांड करत असतात. सर्व वस्तू ऑनलाईन असल्याने कोठे काय मिळते हे सहज समजते. न्युयॉर्कला गेल्यावर मी त्यांच्यावर खूप ओरडते कारण त्यांच्या शोपिंगचे ओझे मला उचलायला लागते. कधी कधी तर माझ्या शॉपिंग्ससाठी देखील जागा नसते.

भाऊ नेहमीच प्रोटेक्टिव आहेत – श्रध्दा कपूर
मी, भाऊ सिध्दांत आणि चुलत भाऊ प्रियांक खूप जवळचे आहोत. प्रत्येक रक्षाबंधनला आम्ही बरोबर असतो.लहानपणी मिठाई मिळत असल्याने रक्षाबंधनसाठी खूप उत्सुक असायचो. लहानपणी त्यांनी मला खूप गिफ्ट्स दिले. खेळणी, ज्वैलरी सर्व मिळायचे. मी त्यांच्यावर खूप प्रेम करायचो. मी त्यांना काय गिफ्ट दिले हे आठवत नाही. आता मोठी झाली असल्यामुळे खाण्याच्या अनेक वस्तू देते. माझे भाऊ माझ्यावर खूप प्रेम करतात. शाळेच्या दिवसात ते खूप प्रोटेक्टिव असायचे. त्यांच्या भितीने कोणी माझ्या-आजूबाजूला देखील येत नसे.

तेच गिफ्ट द्या, जे अफोर्ड करू शकाल – ऋतिक रोशन
ऋतिक रोशनने सांगितले की, माझ्या दृष्टीने रक्षाबंधन सर्वात प्रेमाचा सण आहे. खास गोष्ट म्हणजे ही की, हा सण आपल्या देशातच साजरा केला जातो. यावर आपल्याला गर्व असला पाहिजे. माझ्या बहिणी जेव्हाही मला राखी बांधतात, मात्र माहित नाही का माझ्या डोळ्यात अश्रू येतात. या सणाबद्दल माझ्या मनात एक विशिष्ट जागा आहे. राहिला प्रश्न स्टार बनल्यानंतर महाग गिफ्ट देण्याचा तर तसे काही नाही. माझ्या मते प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला ते गिफ्ट दिले पाहिजे जे नंतर देखील अफोर्ड करू शकेल. याचा अर्थ असा नाही की, मी बहिणीला कमी गिफ्ट्स देतो.

राखी पोस्टाने येते – आयुष्मान खुराणा
तसे तर आम्ही दोघं भाऊ आहोत, सख्खी बहिण नाही. मात्र चुलत बहिणी खूप आहेत. दिल्लीमध्ये अनेक बहिणी आहेत. रक्षाबंधनची अशी काही खास आठवण तर नाही. राहिला प्रश्न स्टार बनल्यानंतरचा तर ते देखील असे काही खास नाही. कारण चंदीगडमध्ये असो की, मुंबईमध्ये राखी पोस्टाने येते. लहानपणी तर चॉकलेट्सने काम चालून जात होते. मम्मी जे द्यायची ते त्यांना द्यायचो. इंडस्ट्रीमध्ये देखील राखी बहिण कोणीच नाही. राखी बहिण बनवले तर अभिनेत्रींबरोबर काम कसे करायचे ? असे कोणतेच नाते नाही.

माझे भाऊ खूप फायदे उचलतात – परिणीती चोप्रा
रक्षाबंधन असा सण आहे जो आम्ही कुटुंबाबरोबर साजरा करतो.  या दिवशी माझे भाऊ खूप फायदा उचलतात. आधी छोटे भाऊ माझ्याकडून 100-200 रूपये घेऊन गिफ्ट्स खरेदी करतात. मात्र आता मी सांगते की, माझ्यासाठी काही तरी खरेदी करा. आता मी त्यांचा फायदा उचलतात. यंदा मी लंडनमध्ये शूट करत असल्याने भावाला ई-राखी पाठवेल.

आम्ही रक्षाबंधन साजरा नाही करत – सिध्दार्थ मल्होत्रा
माझ्या चुलत बहिणींबरोबर मी मोठा झालो आहे. मात्र आम्ही रक्षाबंधन सण साजरा करत नाही. काही वर्षांपुर्वी अपशुकन झाला होता. तेव्हापासून आमच्या कुटुंबातून रक्षाबंधन सण साजरा करण्याची परंपरा बंद झाली. माझ्या बहिणी माझ्याकडून खूप पैसे घेतात. आता अभिनेता झाल्यापासून त्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्यांना वाटते की, मी त्यांना अजून पैसे द्यायला हवे.

बहिणीला भेटायला अमेरिकेला चाललो आहे – सोनू सूद
माझ्या दोन बहिणी आहेत. एक मोठी आणि दुसरी छोटी. मोठी बहिण अमेरिकेला राहत तर छोटी बहिण पंजाबमध्ये राहते. यंदा मोठ्या बहिणीला भेटायला अमेरिकेला जात आहे. माझ्यासाठी हा क्षण खास आहे. नेहमी प्रयत्न करत असतो की, बहिणींसाठी काहीना काही करू. असे नाही की, रक्षाबंधनला अमेरिकेला गेल्याने छोटी बहिण नाराज होणार नाही. ती खूप समजदार आहे. तिला माहिती आहे की, दोन्ही जागेंवर जाऊ शकत नाही. यंदा मोठ्या बहिणीला भेटणार आहे. सांगूनच जात असल्याने हे काही सरप्राईज नाही. कारण सांगितले नाही तर त्यांचा दुसरीकडे जाण्याचा प्लँन असू शकतो.

इंडस्ट्रीमध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन आजही मला भाईसा म्हणते. जोधा अकबर चित्रपटात ऐश्वर्या जोधाबाई आणि मी तिचा भाऊ सुजामल बनलो होतो. आजही कोठे भेट झाल्यावर ती मला भाईसा म्हणते. मात्र असे नाही की, रक्षाबंधनला मी त्यांच्याकडून राखी बांधतो. कारण सर्व कामामध्ये एवढे व्यस्त असतात की, वेळच मिळत नाही.

Leave a Comment