महेंद्रसिंह धोनीने लद्दाखमध्ये फडकवला तिरंगा


महेंद्रसिंह धोनी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यात कार्यरत आहेत. काही दिवसांसाठी क्रिकेटपासून विश्रांती घेत, सैन्यबरोबर कार्य करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये धोनी इतर सैन्याप्रमाणे कार्य करत आहेत. आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी धोनी खास लद्दाखला पोहचला. लद्दाखमध्ये त्याचे शानदार स्वागत करण्यात आले. धोनी लद्दाखला पोहचल्यावर सैना अधिकाऱ्यांनी त्यांना सैल्युट करत त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.


धोनीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहेत. लेफ्टिनंट कर्नल धोनी सैन्याचा गणवेशात दिसत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या एकदिवस आधी धोनी लद्दाखला पोहचले होते. तसेच आर्मी हॉस्पिटलला भेट देत त्यांनी रूग्णांची देखील चौकशी केली. धोनीला लेफ्टिनंट कर्नल ही मानद रँक 2011 मध्ये मिळाली आहे. धोनीला पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.


विश्वचषकामध्ये भारतीय संघ सेमीफायनलमधून बाहेर पडल्यानंतर धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू होत्या. धोनीने दोन महिन्यांसाठी क्रिकेटपासून विश्रांती घेतली असून, तो सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा हिस्सा नाही.

Leave a Comment