तुम्ही पाहिला आहे का नेहा कक्कडचा हा टिकटॉक व्हिडिओ ?


सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये लोकप्रिय गायिका नेहा कक्कड हिची आघाडीच्या गायिकांमध्ये गणती होते. ती नेहमीच आपल्या गाण्यांनी धमाल उडवून देते. त्याचबरोबर ती बऱ्यापैकी सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनेक व्हिडिओ, फोटो आणि टिकटॉक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. तिचा असाच एक व्हिडिओ अलिकडे खूप व्हायरल होत आहे.

चाहत्यांना देखील नेहाचा हा टिकटॉक खूप आवडला आहे. तिने आपल्या नटखटपणाने धमाल उडवली आहे. युजर्सनी तिच्या या व्हिडिओवर खूप कॉमेंट करीत आपली पसंती कळवली आहे. तिने या मजेशीर व्हिडिओत एका अविवाहित तरुणाची व्यथा गंमतशीरपणे मांडली आहे. हिंदी भाषेत असलेल्या या व्हिडिओतील तिचा अभिनयही वाखाणण्याजोगा आहे. ती म्हणते, दोस्तों कल रात तो कुंवारेपन ने हद ही कर दी. मेरे बच्चे सपने में आए और मुझे कहने लगे कि अब्बा कोई मिला या नहीं, हमारी पढ़ाई लेट हो रही है.

Leave a Comment