ड्रामा क्वीनने स्वत:च्या हनिमूनसाठी हॉटेलमध्येच बनविला स्पेशल स्विमिंग पूल


सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंतच्या लग्नाच्या त्याचबरोबर तिच्या नवऱ्याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच आपण लग्न केले असल्याचे खुद्द राखी सावंतनेच ‘स्पॉटबॉय ई’ ला दिलेल्या मुलाखतीत कबुल केले आहे.


माझ्याच एका चाहत्याशी मी लग्न केले आहे. एक असा चाहता जो फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो, असे ती म्हणाली. त्याचे नाव रितेश असे आहे. युकेमध्ये तो व्यावसायिक असून तो युकेमध्येच राहतो अशी माहितीही तिने या मुलाखती दरम्यान दिली. त्यानंतर आपल्या हनिमूनचे बरेच फोटो राखीने सोशल मिडियावर शेअर केले.

View this post on Instagram

Having fun with my love 😍 getting crazy 😜

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


यात आता भर म्हणून ती आपल्या हनिमूनसाठी ज्या हॉटेलमध्ये राहत आहे तिथे तिने आपल्या हनिमूनसाठी एक स्पेशल स्विमिंग पूल बनविल्याचे म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे.


आपल्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल नसून हॉटेलमधील या खास जागेला आपला स्पेशल हनिमून पूल बनविला असल्याचे या व्हिडिओत ती सांगत आहे. आपल्या पतीसोबत हनिमूनला गेलेल्या राखीने या व्हिडिओसोबत आपले बाथ टब मधील सेक्सी फोटो देखील शेअर केले आहेत.


तिचे चाहतेही तोंडाला फेस आणतील असे हे फोटो पाहून थक्क झाले आहेत. थोडक्यात राखी आपला हनिमून खूप एन्जॉय करत आहे असे म्हणायला हरकत नाही. आपली बऱ्याच काळापासून टेलिव्हिजन कार्यक्रमांची निर्मिती करण्याची इच्छा होती, जी आता साकार होणार असल्याचे म्हणत एक चांगला व्यक्ती पती म्हणून आपल्या आयुष्यात आणल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले आहेत.

Leave a Comment