टॉय ट्रक्टर बाजारात आणण्याच्या तयारीला लागली महिंद्रा अॅण्ड महिंद्रा


मुंबई : टॉय ट्रक्टर बाजारात आणण्याच्या तयारीला वाहन निर्मिती करणारी कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लागली आहे. सर्वात छोटा असा महिंद्रा कंपनीचा हा ट्रॅक्टर आहे. कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा म्हणाले, याची तुम्ही कल्पना करु शकणार नाही की, इतका लहान असेल. याबाबत आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. हा टॉय ट्रॅक्टर कृषी प्रधान देशात युवकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येत आहे. शेतीत युवकांचे योगदान मिळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.


शेतीत देशातील तरूण जे योगदान देत आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली भेट असणार आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक महिंद्राचा हा नॅनो ट्रॅक्टर असणार आहे. रिमोटच्या मदतीने तो नियंत्रित केला जाऊ शकतो. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करणे अधिक सुलभ होईल. हा एक १२ व्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून ३ (फॉरवर्ड + रिव्हर्स) गिअर ट्रान्समिशन आहे. स्पीड लॉक फंक्शनदेखील या ट्रॅक्टरमध्ये समाविष्ट केले गेले आहे. या ट्रॅक्टरच्या किंमतीविषयी सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात वेगाने विस्तार करण्याची योजना महिंद्रा आणि महिंद्रा आखत आहेत. कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच कंपनीच्या ७३ व्या वार्षिक एजीएममध्ये सांगितले होते की, वाहन उद्योगात एक मूलभूत बदल होत आहे आणि त्या बदलाचा फायदा घेण्याची वेळ आली आहे. येत्या अडीच वर्षात कंपनी ३-४ इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे.

Leave a Comment