पुन्हा एकदा आमिरच्या मुलीचे हॉट फोटोशूट


आता सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची मुले सज्ज झाली आहेत. बॉलीवूडमध्ये सैफ अली खान, चंकी पांडे आणि श्रीदेवीच्या यांच्या मुलींनी धमाकेदार पदार्पण देखील केले आहे. एका मॅगझीनसाठी शाहरुखनची मुलगी सुहाना खानने देखील फोटोशूट केले. आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलीनेदेखील फोटोशूट केले आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इराने या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करताना “who are you ?” असे कॅप्शन देखील दिले आहे. इराने या फोटोमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधाने केले असून तिचा लूक हटके असल्याचे दिसत आहे. दरम्यान ती अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.


मला कधीच तू कोण आहेस? या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला जाणवले की, आपण आपल्याला हवे ते निवडू शकतो. आपण कोण आहोत हे एक ठराविक गोष्ट ठरवू शकत नाही, असे ती फोटोशूटबद्दल म्हणाली आहे. या फोटोमधून इराचा आत्मविश्वास दिसत आहे.