जिओ गिगाफायबरची नोंदणी करण्यासाठी


आज झालेल्या सर्वसाधारण सभेत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ‘जिओ फायबर’ ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा लाँच केली आहे. जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी पाच सप्टेंबरला जिओ फायबर सेवेचे अधिकृत लाँचिंग करण्यात येणार आहे. १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएस इतका अफाट इंटरनेट स्पीड यामध्ये ग्राहकांना मिळणार आहे. फक्त ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात विविध योजना देण्यात येणार आहेत. जिओ फायबरद्वारे व्यक्तिगत पातळीपासून ते कार्यालये, लहान मोठे उद्योजक तसेच कंपन्यांना हायस्पीड इंटरनेट कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ऑनलाइन नोंदणी जिओ फायबर जोडणीसाठी करण्यात येत आहे.

जिओ फायबरच्या नोंदणीसाठी https://gigafiber.jio.com/registration या संकेतस्थळावर जाऊन तेथे तुमच्या ठिकाणाचे नाव लिहा. ज्याठिकाणी जिओ फायबरची जोडणी हवी, तेथील संपूर्ण पत्ता टाकावा लागेल. त्यानंतर आपले संपूर्ण नाव, फोन नंबर आणि ई-मेल आदी माहिती द्या. तुमच्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका आणि सबमिटचे बटन दाबा. नोंदणीसाठी कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. ज्या भागात तुम्ही राहता त्या भागात जिओ फायबरचे जाळे पोहचलेले असेल तर जोडणी मिळणे शक्य होणार आहे. तुमच्या भागात जोडणी मिळणे शक्य आहे की नाही हे समजण्याची सोय जिओच्या वेबसाईटवर आहे. जागतिक पातळीचा विचार करता स्पर्धकांच्या तुलनेत जिओ गिगा फायबरची किंमत एक दशांश असल्याचा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे. टिव्ही आणि सेट टॉप बॉक्स वर्षभराचा प्लॅन घेतल्यास मोफत मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

Leave a Comment