तुम्ही पाहिले आहे का ‘छिछोरे’चे नवे पोस्टर ?


काहीच दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपुत आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘छिछोरे’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. या चित्रपटाचे कथानक कॉलेजमधील जिवलग मैत्रीवर आधारित असून या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

कॉलेजमधील धमाल मस्ती ‘छिछोरे’ चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या शैलीचे मित्र अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्यासोबत असतात. ‘छिछोरे’ हिच मैत्री साजरी करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.


‘छिछोरे’ची संपूर्ण गँग चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. या पोस्टरमध्ये कॉलेजवयीन आणि उतारवयातील दोन्हीही रूपे दिसतात. सुशांत सिंह राजपुत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर बसिन, तुषार पांडे नविन पोलीशेट्टी, सहर्ष कुमार शुक्ला, अशी या ‘छिछोरे’ची गँग आहे. हा चित्रपट सुरुवातीला ३० ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. मात्र, याच दिवशी श्रद्धा कपूर आणि प्रभासची भूमिका असलेला ‘साहो’ चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे ‘छिछोरे’ आता ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल.

Leave a Comment