केवळ 18 सेंकदात 5000 आकडे लक्षात ठेवते ही मुलगी


जगभरामध्ये उत्तर कोरियाची चर्चा तानाशाह किम जोंग उन आणि त्यांच्या अणू परिक्षणांसाठी जास्त होत असते. मात्र येथील लोकांकडे स्वतःच्या देशावर गर्व करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. स्मरणशक्ती (मेमरी) च्या बाबतीम उत्तर कोरिया कोणापेक्षाही कमी नाही. येथील 22 वर्षीय पांग उन सिम ही केवळ 18 सेंकदात तब्बल 5 हजारांपेक्षा अधिक आकडे लक्षात ठेवते. एवढेच नाही तर ती एक मिनिटांच्या आत पत्त्यांचा पुर्ण कँट (52 पत्ते) पुर्ण ऑर्डर लक्षात ठेऊन तो पुन्हा तसाच्या तसा लावते.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये उत्तर कोरिया पहिल्यांदा वर्ल्ड मेमरी चँम्पियनशीप स्पर्धेत सहभागी झाला होता. यामध्ये पांगनेच देशाचे प्रतिनिधित्व केले होते. कोरियाच्या संघाने 7 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदके पटकावली. पांग सांगते की, हे सोपे नव्हते. मात्र तुम्ही निश्चित वेळेत चांगले प्रयत्न करता त्यावेळी जास्त गोष्टी लक्षात ठेवतात. हे तेवढेही अवघड नाही जेवढं लोक समजतात.

चँम्पियनशीपमध्ये पांग दुसऱ्या स्थानावर राहिली. तिने 5187 बायनरी आकड्यांना आणि 1772 कार्ड्स एका तासात लावले. पांगच्या नावावर पत्त्यांचा कँट त्याच ऑर्डरमध्ये केवळ 17.67 सेंकदांमध्ये लावण्याचा रेकॉर्ड आहे. पांगच्या संघातील री सोंग 7 व्या स्थानावर राहिली. तिने 15 सेंकदात 302 शब्द सांगितले.

चँम्पियनशीपच्या एका इव्हेंटमध्ये 60 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवावे लागतात. यामध्ये 5 टॉप खेळाडूंमध्ये तीन उत्तर कोरियाचे होते. यामधील दोघांनी वर्ल्ड रेकॉर्ड तोडला.
आयोजकांना शेवटचा क्षणापर्यंत आशा नव्हती की, उत्तर कोरियाची टीम स्पर्धेत सहभागी होईल. चँम्पियनशीपचे संस्थापक टोनी बुजान सांगतात की, रजिस्ट्रेशन संपत आले होते. त्यांच्या संघाने अंतिम क्षणी येत नोंदणी केली. चँम्पियनशीप संपताना आश्चर्यचकित होण्याची आमची वेळ होती. 10 इव्हेंटमध्ये उत्तर कोरियाचे खेळाडू टॉप 3 मध्ये होते.

उत्तर कोरियाच्या टीमचे कोच चा योंग हो यांच्यानुसार, स्मरणशक्ती तंत्र कसे लक्षात ठेवावे हे त्यांना शाळेत असल्यापासूनच सांगितले जाते. वस्तूंना लक्षात ठेवण्यासाठी आम्ही भावना, स्वाद, गती, कल्पना, श्लोक यासारख्या अनेक गोष्टींची मदत घेतो जी आपल्या डोक्यात असतात.

Leave a Comment