5 सप्टेंबरपासून तुमच्या सेवेत दाखल होणार रिलायन्स जिओ गिगाफायबर


नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आज पार पडलेल्या सर्वसाधारण बैठकीत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या असून रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात जिओ लाँच केल्यानंतर खळबळ माजविली होती. प्रतिस्पर्धी कंपन्या यातून सावरत नाहीत तोच जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी रिलायन्सने फोडल्यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार एवढे मात्र नक्की आहे. ही सेवा सुरुवातीच्या काळात 1600 शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

700 रुपयांपासून जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात सुरु होणार आहे. त्याचबरोबर 10 हजार रुपयांपर्यंत हे प्लॅन आहेत. तसेच फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. येत्या 5 सप्टेंबरपासून गिगाफायबरची सेवा सुरू होणार आहे.

700 रुपयांपासून जिओ गिगाफायबरचा डेटा प्लॅन सुरू होणार आहे. याचा वेग 100 Mbps असेल. ग्राहकांना यामध्ये ब्रॉडबँड, जिओ होम टीव्ही आणि Jio IoT सेवा मिळणार आहे. जिओ लँडलाईन सेवा यासोबत मोफत देणार आहे. यामध्ये आयएसडी कॉलिंगचे दर हे इतर कंपन्यांपेक्षा दहा पटींनी कमी असणार आहेत. 5 सप्टेंबरला जिओच्या वेबसाईटवर या प्लॅनची माहिती मिऴणार आहे.

1000Mbps ते 1 जीबीपीएस एवढा प्रचंड इंटरनेटचा वेग असणार आहे. डिजिटल टीव्हीसोबत क्लाऊड गेमिंगही यामध्ये करता येणार आहे. जिओने याशिवाय पोस्टपेड प्लस ही सेवाही लाँच केली आहे. फॅमिली प्लॅन्स, डाटा प्लॅन, आंतरराष्ट्रीय रोमिंग, फोन अपग्रेडस्, होम सोल्यूशन यामध्ये तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असणार आहेत. जिओने याशिवाय आणखी एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. जिओ फायबर ग्राहकांनी जर जिओ फॉरेव्हर प्लॅन घेतल्यास त्यांना खूप काही मिळणार आहे. यामध्ये HD/4K टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर जिओच्या गीगा फायबरच्या प्रीमियम ग्राहकांना रिलीजच्या दिवशीच घरबसल्या चित्रपट पाहता येणार आहेत. फर्स्ट डे फर्स्ट शो असे नाव जिओने या प्लॅनला दिले आहे. 2020 पासून ही सेवा सुरू होणार आहे.

Leave a Comment