मजुरी करणाऱ्या महिलांना टाटाकडून मिळाली सोलर लाइटची ऑर्डर

रांची येथील ओरमांझी येथील 15 महिला या अनेकांसाठी उदाहरण बनल्या आहेत. कधीकाळी मजुरी करणाऱ्या या महिला आता सोलर लाइट बनवत आहेत. ओरमांझीच्या मॉडल ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाद्वारे सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे जोडल्या गेलेल्या या महिलांनी आतापर्यंत 2 हजार सोलर लाइट बनवल्या आहेत.

त्यांना दोन कंपनींद्वारे 30 हजार सोलर लाइट बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये 20 हजार सोलर लाइट बनवण्याची ऑर्डर टाटा स्टील कंपनीने दिली आहे. हे सर्व प्रशासनाच्या मदतीने झाले आहे. एक लाइट बनवण्याचा खर्च 95 रूपये असून, बाजारात त्याची किंमत 120 रूपये आहे. लाइटमध्ये लागणारे ट्रांसफॉर्मर देखील महिला स्वतःच बनवतात. एलईडी बल्ब, सोलर प्लेट आणि बॉडी हैद्राबादवरून मागवण्यात येतात. कँपिसेटर, ट्रांजिस्टर आणि रजिस्टेंस कोलकत्ता आणि दिल्लीवरून आणण्यात आले आहेत.

ही लाइट उंचावरून पडल्यानंतर देखील तूटत नाही. तसेच याला वॉटर प्रुफ देखील बनवण्यात आले आहे. ट्रेनर श्याम प्रजापती यांच्यानुसार, एखादी व्यक्ती पाण्यात देखील ही लाइट घेऊन गेला तरी तेथे देखील सुरू राहील. तसेच यावर सहा महिन्यांची गँरेटी देखील आहे. सोलर पँनल या लाइटीच्या बेस प्लेटवर लावण्यात आले आहे. चार्ज करण्यासाठी एखाद्या बॉटलमध्ये उलटेकरून ठेवता येऊ शकते. 45 मिनिटात एक लाइट बनते. या महिला रोज 400 रूपये कमवत आहेत.

Leave a Comment