पाच महिन्यांचे क्यूट बाळ वडिलांबरोबर करते फुड डिलिव्हरी

बँकॉकमध्ये राहणारे पानुवात बाल मनश्री हे फुड डिलिव्हरी करण्याचे काम करतात. बँकॉकमध्ये ते आपली पत्नी आणि पाच महिन्यांच्या मुलाबरोबर राहतात. मुलाच्या जन्माला केवळ तीन महिनेच झाले असताना आर्थिक परिस्थितीमुळे पत्नीला कामावर परतावे लागले. यामुळे पानुवात बालला बाळाजवळ थांबणे आवश्यक झाले. त्यामुळे त्याचा परिणाम कामावर देखील झाला. एकेदिवशी मुलाला बाईकवरून फिरवत असताना त्यांना दिसले की, बाईकवर फिरताना बाळ खुश असते. त्यानंतर त्यांनी मुलासाठी हलक्या वजनांचे हेल्मेट खरेदी केले. त्यानंतर ते मुलाला पॉल्युशन मास्क लावत कँरी बँगमध्ये बसवून फुड डिलिव्हरी करू लागले. असे करतानाच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

त्यानंतर बाल यांनी आपल्या मुलाचे एडवेंचर दाखवण्यासाठी युट्यूब चँनेल देखील सुरू केला. त्यावर ते आपल्या मुलाचे आणि त्यांचे रायडिंगचे व्हिडीओ अपलोड करतात. असे ते मागील दोन महिन्यांपासून करत आहेत. आता त्यांचा मुलगा पाच महिन्यांचा असून, लोकांना त्यांचे व्हिडीओ आवडत आहेत. काही दिवसांपुर्वीच एका ट्विटर युजरने त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला होता. लोकांना आवड व्हिडीओ खूपच आवडला होता.

बाल यांच्यानुसार, बँकॉकमधील महागाईमुळे पती-पत्नी दोघांनाही काम करावे लागते. मात्र ते आपल्या मुलाला कोणत्याही नातेवाईकाकडे सोडू इच्छित नाहीत. त्यामुळे ते मुलाला घेऊन रायडिंग करतात. ते सांगतात की, मुलाला घेऊन डिलिव्हरी करण्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू केले आहे. ते त्याच्या सुरक्षेची पुर्ण काळजी घेतात. मुलगा देखील मोटरसाइकलवर फिरताना आनंदी असतो.

बालने सांगितले की, ते रोज 6 तास बाईकवर फिरतात. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत फिरतात. आपल्या चँनेलबद्दल त्यांनी सांगितले की, युट्यूबर बनने हे त्यांचे ध्येय नाही. मात्र मुलाला एडवेंचर आवडते आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लोकांना त्याच्या क्यूट क्यूट गोष्टी आवडतात. त्यामुळे ते अपलोड करतात. यामुळे त्यांना टिव्ही शो आणि स्थानिक गेम शोमध्ये देखील बोलवण्यात आले होते. त्यांच्या चँनेलचे नाव बाल 1997 असे आहे.

Leave a Comment