ऋतिक-टायगरच्या ‘वॉर’चे पहिले पोस्टर रिलीज


आपल्या डान्स आणि अॅक्शनसाठी ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दोघेही ओळखले जातात. बऱ्याच काळापासून त्यांच्या ‘वॉर’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आता रिलीज करण्यात आले आहे.


या चित्रपटात ऋतिक आणि टायगर एकत्र येणार असल्याचे कळाल्यापासून चाहत्यांना एकच उत्सुकता लागून राहिली आहे. टीझरमध्ये हा एक अॅक्शनपट असल्याची झलक पाहायला मिळाली होती. टायगर ऋतिकला आपला प्रेरणास्रोत मानतो. पण, चित्रपटात दोघेही एकमेकांना टक्कर देताना पाहायला मिळतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद हे करत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Leave a Comment