बकरी ईद : कुंग फू स्टाइलने लात मारतो हा चायनीज बकरा

आज संपुर्ण भारतात बकरी ईद साजरी केली जात आहे. हा दिवस रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर 70 दिवसांनी येत असतो. बकरी ईदचा सण हा मुख्यता कुर्बानीचे पर्व स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. इस्लाम धर्मात मीठी ईद नंतर बकरी ईद सर्वात मोठा सण आहे. या बकरी ईदच्या निमित्ताने सोशल मीडियावर एका बकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बकरी एका व्यक्तीला लात मारत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

या बकऱ्याला चायनीज बकरा म्हटले जात आहे. कारण तो कुंग फू स्टाईलमध्ये व्यक्तीला लात मारतो. युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, चायनीज बकऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्याला कुंग फू माहितीये.

बकरी ईद का साजरी केली जाते ?

इस्लाम धर्म मानणाऱ्यांसाठी बकरी ईदचे विशेष महत्त्व आहे. इस्लामिक मान्यतांनुसार,  इब्राहिम आपला मुलगा इस्माईलला याच दिवशी देवासाठी बळी देण्यास चालला होता. तेव्हा देवाने त्यांच्यावर खुश होत त्यांच्या मुलाला जीवनदान दिले. हा दिवस याच आठवणीत साजरा केला जातो. त्यामुळे तेव्हापासून या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो.

Leave a Comment